योगशिक्षणातून किशोरांचा व्यक्तिमत्व विकास

मानवी संस्कृतीच्या प्रारंभी योगाचा उदय झाला तेव्हा मानवाला प्रथम आपल्या अध्यात्मिक क्षमतेची जाणीव झाली व या क्षमतेचा अधिक विकास करण्यासाठी तो विविध प्रयोग करू लागला, त्यासाठी विविध कौशल्य विकसित करू लागला. परिणामतः कालांतराने संपूर्ण जगभरातील प्राचीन ऋषीमुनींनी योगशास्त्र विकसित व उन्नत केले. 
 योगशास्त्र सुस्पष्ट एकत्रित व समग्र पद्धतीने प्रथम सूत्रबद्ध करण्यात आले ते महर्षी पतंजलींनी राजयोगा वर लिहिलेल्या योगसूत्र या संहितेत. 
 महर्षी पतंजलींनी इसवीसनपूर्व सुमारे दुसऱ्या शतकात योगशास्त्राची मांडणी केली त्यांनी योगसूत्र या ग्रंथात योगाचे शास्त्र अत्यंत मोजक्या शब्दात संपूर्ण व मुद्देसूद मांडले आहे. 
 महर्षी पतंजलींनी मांडलेला अष्टांग योग म्हणजे आठ साधने असलेला योग.. ती आठ अंगे म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. 
 प्रा. डॉ. भाग्यश्री प्रभाकरराव सुभेदार- गंगाखेडकर

Comments